इंदौर :- अखिल भारत हिंदुमहासभेच्या वतीने रविवार दिनांक १३/०३/२०१६ रोजी १२:०० वाजता सोन्यावर उत्पादन शुल्क कायदा लागु केल्याच्या विरोधात इंदौरमधील राजवाडा परिसरात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याचे प्रमुख कारण म्हणजे, सोन्यावर अशा प्रकारे कर लादल्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकास याचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. हा कायदा सामान्य माणसाच्या हिताचा नसून अहिताचाच आहे. त्याच बरोबर स्वर्णकार व सराफा व्यापारी यांना या जाचक कायद्यामुळे लेखा जोखा (अकौंट) ठेवण्यात समस्या निर्माण होत आहेत. याचसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुवर्णकार व सराफा व्यापारी यांनी संपाचे हत्यार उपसून उपोषणास बसले आहेत. तरी देखील केंद्र सरकार यांची गांभीर्याने दखल घेत नाही आणि म्हणूनच या विरोधात हिंदुमहासभा इंदोर शाखेच्या वतीने अर्थमंत्री यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हिंदुमहासभेच्या वतीने केंद्र सरकारला मागणी करण्यात येत आहे की, हा जनविरोधी कायदा त्वरित रद्द करण्यात यावा. यातच जनतेचे हित आहे. अन्यथा राष्ट्रहितासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यास हिंदुमहासभा कटीबद्द आहे याची सरकारने नोंद घ्यावी.]]>