अंदमानच्या जेलसमोर मद्राशाने लुंगी सोडली नि परवा लोकसभेत युवराजांची पुंगी वाजली पेट्रोल पिऊन काजवे आता सूर्यावरती थुंकू लागले जनापथावरचे अडाणी श्वान पिसाट होऊन भुंकू लागले मणि आणि युवराजांना सावरकर कळलाच नाही कारण देशभक्तीच्या पीळासाठी यांचा सुंभ जळालाच नाही! अरे कावेबाज कोल्ह्यांनो, तो तर साक्षात वाघ होता स्वतंत्रतेचे स्तोत्र गाणारा प्रकाशवान चिराग होता अंदमानच्या कराल कोठडीत त्याने कोलू पिसला होता नि या देशाच्या मुक्तीसाठी तो तरुण वयात झिजला होता जातीपाती नष्ट करणे हेच त्याचे स्वप्न होते आणि मेलेल्या प्रेतांनाही जागवणारे स्फुर्तिदायी भाषण होते कवितेमध्ये शब्द कुठे ते तर धगधगते अंगारे होते नि खिळ्यांचीच लेखणी झाली तेव्हा भिंतीवर शहारे होते पण स्वातंत्रवीरांचे काळीज अपमानाने जळते आहे कारण सोनियापुत्राची जीभ काहीबाही बरळते आहे यांचे बेगडी गांधीप्रेम आता साऱ्या जगाला कळते आहे नि अंदमानचे काळे पाणी आंसू पिऊन रडते आहे, आंसू पिऊन रडते आहे! लेखक:- अनभिज्ञ (संकलन:- श्री. यशवंत कुतुरकर)]]>