इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून समीर सरदाना यास गोव्यात अटक : एन्.आय.ए.कडून कसून चौकशी ! पणजी – वॉस्को रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असतांना इस्लामिक स्टेट (इसिस)च्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला ४४ वर्षीय समीर सरदाना निवृत्त मेजर जनरलचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. समीर हिंदु असून तो इस्लाम धर्माला मानतो, असे सांगितले जात आहे. गोवा आतंकवादविरोधी पथक गेल्या तीन दिवसांपासून त्याची चौकशी करत आहे. त्याच्याकडे काही संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्याकडून लॅपटॉप, पाच पारपत्रे आणि चार भ्रमणभाष (मोबाइल) जप्त करण्यात आले आहेत. समीरच्या भ्रमणसंगणकाचा (लॅपटॉप) पासवर्ड शोधून काढण्यात यश आले असून त्यातून काही महत्त्वाचे ई-मेल हाती लागले आहेत. या ई-मेलमध्ये देशाच्या अनेक भागांत झालेल्या बॉम्बस्फोटांचा उल्लेख आणि अन्य तपशील आढळून आला आहे. गोव्यातील रामनाथी येथे सनातन संस्थेचा आश्रम आहे. सनातन संस्था हिंदुत्ववादी असल्याने ती जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य आहे. या अनुषंगाने आश्रमावर आक्रमण करण्याच्या संदर्भात सरदाना काही सिद्धता करत होता का, या दिशेनेही केंद्रीय गुप्तचर संस्था त्याची चौकशी करत असल्याचे दैनिक गोमंतकने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान ४ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्.आय्.ए) सरदाना याची चौकशी करण्यात आली. (दैनिक सनातन प्रभात, ५.२.२०१६) (श्री. वसंत सणस:- नवी मुंबई)]]>