पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला: परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||धृ|| शंकराचार्य अर्थः- या भूतलावर तुझे अनेक सरलमार्गी पुत्र असती, पण त्यांच्यामध्ये मीच असा तरल स्वभावाचा असा तुझा पुत्र आहे. माझा असा त्याग करणं तुला शोभत नाही, कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीच कुमाता नसते. मराठी रूपांतर …
तुझे येथे पुत्र , असति किती ते आई सुजन परी त्यांच्या मध्ये , मीचि असे तरिही हा कुजन तरीही माझा ग, त्याग तुजला शोभत न गे कुपुत्राचे होणे, शक्य परि कुमाता न शक्य गे– चारुचंद्र उपासनी (संकलक:- श्री. हर्षल मिलिंद देव, नालासोपारा, पालघर)]]>