त्रिवेंद्रम : कर्णधार सुनील छेत्री याने अधिक वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर भारताने २०१५ च्या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अफगाणिस्तानला २-१ ने लोलावत सातव्यांदा स्पर्धेला गवासणी घातली. २०१३ साली झालेल्या स्पर्धेचा वचपा काढण्याच्या उद्धेशाने उतरलेल्या भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर भर दिला. तर दुसरीकडे अफगाणिस्तानने हि चांगला खेळ करीत भारताला मजबूत टक्कर दिली. पूर्वार्धात कोणत्याही संघाला गोल करव्यात यश आले नाही. दोन्ही संघ ०-० अश्या बरोबरीने खेळले. उत्तरार्धात अफगाणिस्तानने दमदार आक्रमण करीत ७० व्या मिनिटाला झुब्यार अमिरीने चेंडूला गोल पोस्टमध्ये धाडीत अफगाणिस्तानला १० अशी आघाडी दिली. परंतु संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारताने लगेच ७२ व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात बरोबरी आणली. फॉर्ममधे असलेल्या जेजेने भारतासाठी महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कोणत्याही संघाला गोल करता न आल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामन्याचा निकाल लागण्यासाठी प्रेक्षकांना अधिक वेळेची वाट पहावी लागली. अधिक वेळेच्या पूर्वार्धात भारताचा कर्णधार व अनुभवी खेळाडू सुनील छेत्री याने १०१ व्या मिनिटाला गोल करीत भारताला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली आणि भारताने ही आघाडी शेवटपूर्ण अबाधित ठेवत सामना जिंकला. अफगाणिस्तान (१५०) च्या तुलनेत भारताने (१६६) जबरदस्त खेळी करीत भारतातील फुटबॉलला पुन्हा एकदा जिवंत केले असेच म्हणता येईल.]]>