सनातनला सर्व साधूसंतांचा एकमुखी पाठिंबाह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

नाशिक – कॉ. पानसरे प्रकरणात केवळ संशयित म्हणून सनातन संस्थेच्या एका साधकाला कह्यात घेण्यात आले; म्हणून संपूर्ण सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणे चुकीचे आहे. एखाद्या पक्षात किंवा संस्थेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीची कृती केल्यास त्या पक्षावर किंवा संस्थेवर बंदी घातली जात नाही. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना हिंदुत्वाचे आणि हिंदुत्व रक्षणाचे कार्य करत आहेत. संपूर्ण वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणांना त्यांचा तपास करू द्यावा, असे ठाम प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. येथील जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज यांच्या मंडपात २० सप्टेंबर या दिवशी संत गुलाबराव महाराज समाधी शताब्दी महोत्सव पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सर्व साधूसंत उपस्थित होते. या वेळी पू. श्री. गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी हिंदुत्वासाठी गौरवशाली कार्य केले आहे. सध्या सनातनला चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या बाजूने संघटितपणे उभे रहाणे, हे आपले कर्तव्य आहे. आम्ही सर्व जण सनातनच्या पाठीशी आहोत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वाचे कार्य करतात. आज आपण सर्वांनी आम्हाला एकमुखी पाठिंबा दिला. त्याविषयी आम्ही आपणा सर्वांचे ऋणी आहोत, अशा शब्दांत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी आभार मानले.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *