श्री काळाराम मंदिर, नाशिक

रामाच्या  मिश्या…

नाशिक च्या काळारामाचे वैशिष्ट्य

येथे चैत्र गुढिपाडवा ते चैत्र शुध्द त्रयोदशी माध्यान्न राज उपचार महाअभिषेक झाल्यानंतर प्रभूरामचंद्र – लक्ष्मणनला सोन्याच्या मिश्या लावल्या जातात  …

[gallery columns="4" link="file" ids="86,87,88,89"]

भगवान शिवाचे ..भैरव..खंडेराव  दर्शन या स्वरूपात होते..सूर्य देवाला मिश्या आहेत  परंतु संपूर्ण भारतातील कोणत्याही वैष्णव मूर्तीच्या {विष्णू ,राम, कृष्ण, बालाजी, विठ्ठल ,मोहनीराज} मिश्या नाहीत. या संर्दभात वाल्मीकी रामायणात एक कथानक आले आहे …बघा वाल्मीकी रामायण :- अरण्यकाण्ड षडविंशः{२६ } सर्ग.श्लोक क्र.४ रामः क्रोधं परं लेभे वधार्थं सर्व रक्षसाम्…. प्रभूरामचंन्द्र ज्या वेळी दंडकारण्यात आले त्या वेळी खर दुषन त्रीशिर शूर्पनखा यांच्या सह रावणाचे महा बलाढ्य १४ हजार राक्षस  याच पंचवटीत वास्तव्यास होते. देवांना देखील दूर्रजय असलेल्या महा बलाढ्य राक्षसांचा अजानबाहू असलेल्या प्रभूश्रीरामांनी अवघ्या दिड मुहुर्तात म्हणजे ४५ मिनिटांत वध केला त्या प्रसंगी रामाच्या चेहऱ्याकडे कोणीही पाहुशकत नव्हते जणू ते राक्षसांचे काळ भासत होते. उग्र तेज रामरायांच्या चेहऱ्यावर क्रोध धारण केल्यामुळे प्रकटले होते जणु ते राक्षसांचे काळ, भासत होते म्हणून ते काळराम राक्षसांना दंड देणारे शिक्षा करणारे. एरवी..”दशरथ तयनं शामलं शान्तमूर्तिम्”  …नव्हते वोर रस धारण केलेले दिसत होते.प्रभूरामांच्या जिवनातील प्रथमच ऐवढा मोठा युद्ध प्रसंग …प्रचंड मोठा पुरूषार्थ गाजवीला. आज ही सैन्यात १४ हजाराची एक बटालीयन असते. म्हणजे त्या काळी रावणाची एक संपूर्ण बटालीयन नाशिक पंचवटी दंडकारण्यात होती. श्रीराम बाण केव्हा भात्यातुन काढीत केव्हा जोडून सोडीत होते हे सुद्धा समजत नव्हते … पुरूषार्थाची पराकाष्ठा वीर शौर्य तेज उग्र सर्वच भाव रामांच्या चेहऱ्यावर. मिशी त्यांचे पराक्रमाचे प्रतिक…म्हणून रामास सोन्याची मिशी लावली जाते…सायंकाळी शेजआरतीच्या वेळी मिशी काढल्यानंतर राम पुन्हा सुंदर शांत दिसतांत..!..श्रीमहंत..!…

संकलन : श्री अरूण निखडे

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *