दोन मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा "जुगार"

पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचे आगमन झाले. ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले. तुमचे नाव काय…..? तुमचे गाव काय….? असे प्रश्न विचारण्यात आले…. कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचे इंजिनीअर….. माझा नंबर येताच… मी पटकन उभा राहिलो व चटकन सांगितले “सर, माझे बाबा शेतकरी आहेत.” मी असं म्हणताच सगळा वर्ग हसायला लागला….. मला याचा फार राग आला….. मी म्हटले “सर मी नाही म्हणत, या साऱ्यांचा धंदा छोटा हाय, पण,….या काळ्या आईची शपथ सर…या साऱ्याहून माझा बाप मोठा हाय…. हाडाची काडं करून रात दिन राबत असतो, तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो… काड्याकुड्याचं जिनं त्याचं पण, साऱ्या जगाला भाकर देतो.. अन् साऱ्या जगाला भाकर देणारा, कधी कधी उपाशीच झोपतो माहित नसताना पाऊस येईल-नाही येईल, हजारो रुपये मातीत गाळतो, खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो. सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतात पण, माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो. अन्, या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच हरतो. माणुसकीच्या गावामध्ये अजून त्याची वस्ती हाय, खरंच सर माझ्या बापाची मरणा संग दोस्ती हाय…. फाटके तुटके कपडे सर तो अजूनही अंगावर घालतो…., पण, सर मला तुमच्या कपडयाचाही त्याचाच घामाचा वास येतो. टाकून पहा मातीत सर तुम्ही पाच-पन्नास हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल, त्याच्या जगण्याचा जुगार. म्हणून, म्हणतो सर अभिमान हाय मला माझा बाप शेतकरी असल्याचा अभिमान आहे मला मी या शेतकऱ्याचा वारस असल्याचा जग लिहिते आईसाठी, जग लिहिते साऱ्यांसाठी पण, मी लिहितो बापासाठी, त्याच्याच जीवनाचा जुगार……..” दारूचा स्टाॅक संपत नाही तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक कधी संपत नाही. तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा स्टॉक कसा काय संपतो……? आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध होतो….. दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा….. . बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. …. कारण, ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा स्टाँक संपेल ना तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही. सर्वानसाठी पोस्ट केला पन जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट मनापासून पटल तर शेयर करा. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप नाही येणार. विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !! ]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *