चैत्र पौर्णिमा अर्थात पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथि

जय जय श्री शिवराय धारकऱ्यांनो राम राम, काल चैत्र पौर्णिमा अर्थात पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पुण्यतिथि . या निम्मिताने काल श्री शिवतीर्थ, दादर (शिवाजीपार्क) येथे शिवरायांच्या मूर्तिजवळ मानवंदना देण्यात आली. मुंबईतील विविध विभागातून शिवभक्त आले होते. दुर्गवीर , हिंदवी सेना, शिव-दुर्गप्रेमी (वांद्रे) तसेच पनवेल, बेलापुर, नेरुळ शिवभक्त आले होते. नालासोपारा येथून शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. मिलिंदराव देव , इत्यादि विविध संघटना आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – मुंबई विभागातील धारकरी यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी शिवस्मारकासमोर विलेपार्ले येथील श्री. विनायकराव बालगुडे यांच्या हस्ते ‘शिवज्योत’ प्रज्वलित करण्यात आली. ही ‘शिवज्योत’ दर रविवारी प्रज्वलित केली जाणार आहे . याच मुख्य कारण हे की शिवस्मारका समोर विद्युत दिवे (लाइट्स) नसल्याने बृहमुंबई महानगर पालिका आणि स्थानिक राजकीय पक्ष कार्यालायात सदर गोष्टीची लेखी तक्रार केली आहे. आणि सुदैवाने तक्रारीला योग्य चाल मिळाली आहे. शिवपुण्यतिथि या अनुशंगाने मुंबई मधील अनेक विभागातून धारक़री आले होते. सर्व शिवप्रेमी संघटना सहभागी होत्या. सर्वांच्या उपस्थितीत सरकार आणि स्थानिक व्यवस्थेविरुद्ध लाइट्स नसल्याने आपण तिथे शिवज्योत प्रज्वलित केली आहे ( किमान आत्ता तरी यांचे डोळे उघडावे हाच हेतु) सदर गोष्टीचा पाठपुरावा घेण्यासाठी शिवाय शिवसेना, मनसे या पक्षाचे शिवभक्त तिथे उपस्थित होते या (खरतर दॄश्य पाहुन काहींना लाज वाटली असावी कारण काही फुटांवरच बाळासाहेबांचे स्मारक शक्तिस्थळ आहे आणि तिथे फ़ुटफुटांवर दिवे आहेत शिवाय मैदानात जिथे नजर जाईल तिथे लाइट्स आहेत पण शिवस्मारक जवळ अंधार अगदी काळोख) आणि येत्या रविवार पर्यंत सर्व काही ठीक करू अशी ग्वाही सुद्धा दिली आहे.(जो पर्यन्त करत नाहीत तोवर आपण त्यांना निष्क्रियच समजू) सदर गोष्टीची दखल मुंबईचे सरसेनापति श्री बळवंतराव दळवी आणि श्री शिवतीर्थ प्रमुख श्री सुशीलकुमार वर्मा यांनी घेऊन तक्रारी, निवेदन केले. काल सर्व शिवभक्तांना मुंबईचे श्रद्धास्थान श्री भरतदादा माळी यानी शिवरायांचा इतिहास सर्वांसमोर मांडला आणि थोडक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान विषयक पुरेशी माहिती दिली. तसेच इतिहास अभ्यासक राजेंद्र सावंत यानी संबोधन केले. आता ब्रिगेडि, ब्रिगेडि जो जपनाम आपलीच धारकरी करत आहेत त्यांच्याबद्दल आपण एक रणनीति कार्यक्रम अखला आहे त्याला नाव परिसंवाद दिल आहे. आणि काल त्याचे पाहिले प्रदर्शन सुद्धा झाले. म्हणजे अर्थात काय? म्हणजे अस की ब्रिगेडि मूळ कशाच्या आधार घेऊन भुकतात, अभ्यास करतात, समकालीन काही पुरवा घेतात का?असे प्रश्न मंचावर समालोचक विचारणार आणि काही इतिहास अभ्यासक, इतिहास तद्न्य, शिवचरित्र अभ्यासक, वेद-पुराण अभ्यासक, धर्म अभ्यासक असा एक वर्ग तयार करून उत्तरे देणार. आणि हां कार्यक्रम मुंबईतील विभागा विभागामध्ये घेण्याचे ठरले आहे. उदा. समालोचक:-1) शिवरायांचा खून हा ब्रम्हणांनीच केला, राजवाड्यात कोणी नसताना हे खर आहे का? उत्तर:-(अपल्यपरिणे अभ्यासाने, समकालीन पुराव्याने आपले अभ्यासक सर्वांना कळवनार आहेत) म्हणजे ब्रिगेडि उंदीर आता बिळात सुद्धा लपणे अशक्य. या कार्यक्रमाची आखनी श्री शिवप्रतिष्ठानचे प्रतापराव गुजर माझे आदर्श श्री अनंतराव करमुसे आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्री.बळवंतराव दळवी यांनी केली आहे. कार्यक्रमाला आलेल्या ज्ञातअज्ञात शिवभक्तांचे पुन्हा आभार ! चला आता तत्पर रहा परिसंवादासाठी. अभिजित रणदिवे – संकलन]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *